Virar | Jivdani Mandir | Navratri 2024 | जीवदानी मंदिर शारदीय नवरात्रोत्सवासाठी मंदिर प्रशासन राज्ज

उद्या नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे यादरम्यान अनेक ठिकाणी दुर्गेच्या आगमनासाठी भक्त सज्ज झाले आहेत. याचपार्श्वभूमीवर विरारमधील सुप्रसिद्ध अशा जीवदानी देवीच्या मंदिरात देखील मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत आहे.
Published by :
Team Lokshahi

उद्या नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे यादरम्यान अनेक ठिकाणी दुर्गेच्या आगमनासाठी भक्त सज्ज झाले आहेत. ठिकठिकाणी नवरात्री उत्सवानिमित्त लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक देवीच्या मंदिरांमध्ये सजावट केली गेली आहे. याचपार्श्वभूमीवर विरारमधील सुप्रसिद्ध अशा जीवदानी देवीच्या मंदिरात देखील मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत आहे. विरारमध्ये शारदीय नवरात्रोत्सवासाठी जीवदान मंदिराचे प्रशासन राज्ज झालेले आहेत. मंदिर परिसरातील सर्व कामे पुर्ण झालेली असून सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व उपाय योजना पुर्ण झाल्याचा दावा मंदीर प्रशासनाने केला आहे.

यावर जीवदानी देवी मंदिर ट्रस्टी पंकज ठाकूर म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे भाविकांच्या दृष्टीने बऱ्याच उपाय योजना नेमलेल्या आहेत तसेच सुरक्षेच्या दृष्टीने जवळजवळ 150 च्या वर सीसीटीव्ही कॅमेरे गडाच्या पायथ्यापासून ते गडापर्यंत असं सगळ्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com